Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अशोक खरात पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा ‘हवाला रॅकेट’

ताज्या बातम्या

अशोक खरात पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा ‘हवाला रॅकेट’

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक : भाडं ऐकून व्हाल थक्क

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. खरात याने केवळ अंधश्रद्धेच्या नावाखालीच नव्हे, तर ‘हवाला’ रॅकेटच्या माध्यमातूनही आपले जाळे विणल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवण्यासाठी मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा वापर केला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने मुंबईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एक स्पेशल सूट कायमस्वरूपी बुक केला होता. या रूमचे दिवसाचे भाडे 25 हजार रुपये इतके होते. वर्षाचे 365 दिवस ही रूम खरातच्या नावावर बुक असायची. याच आलिशान रूममधून कोट्यवधी रुपयांच्या हवाला व्यवहारांची देवाण-घेवाण आणि आखणी केली जात असल्याचे तपासात समोर येत आहे.

अशोक खरात प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय धागेदोरे मिळण्याची शक्यता बळावली आहे. हवाला रॅकेटचा पैसा थेट दुबईपर्यंत पोहोचत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची व्याप्ती राज्याच्या सीमा ओलांडून परदेशापर्यंत पसरलेली असल्याने, एसआयटी आता त्या दिशेने कसून तपास करत आहे.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणात अडकलेल्या सुमारे आठ ते नऊ पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांनी मानसोपचार तज्ञांची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला घरातच एकट्या राहत असून नैराश्याच्या सावटाखाली असल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने महिलांना कोणतेही दडपण न घेण्याचे आवाहन करत त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची ग्वाही दिली आहे.

तसेच पीडित महिलांची अज्ञातस्थळी चौकशी करण्यात येत असून त्यांचा मानसिक त्रास लक्षात घेऊन संवेदनशील पद्धतीने प्रकरण हाताळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, अशोक खरात आणि पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सायबर पोलिसांकडून संबंधितांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add