Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पुनर्वसनाचा मार्ग मोकळा ! मुक्ताईनगरला ३८५ कोटींचा निधी मंजूर !

ताज्या बातम्या

पुनर्वसनाचा मार्ग मोकळा ! मुक्ताईनगरला ३८५ कोटींचा निधी मंजूर !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 8, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश! गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.


मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.


​या गावांना मिळणार न्याय:
मुक्ताईनगर शहर (४१३+२२ घरे), भोकरी,पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे,नरवेल,पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी , पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आंदलवाडी या गावातील रखडलेल्या नागरी सुविधा व काही नवीन घरांच्या प्रस्तावासाठी या 385 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.


याप्रसंगी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील,आ. चंद्रकांत पाटील, नंदकुमार महाजन, विनोद तराळ आणि त्या गावातील प्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते.​दिलेला शब्द पाळला! विकासाचा संकल्प, प्रगतीचा मार्ग!

बैठकीस मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील, आ. चंद्रकांत पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे, मंत्री ना. संजय सावकारे ,यांच्यासह भाजपा रावेर लोकसभा संपर्क प्रमुख नंदकुमार महाजन, महाराष्ट्र राज्य ‘माफदा’ अध्यक्ष विनोद तराळ आणि संबंधित गावातील प्रमुख प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add