Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मौजे वंजारी येथील शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

ताज्या बातम्या

मौजे वंजारी येथील शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

धरणगाव, – मौजे वंजारी ता. धरणगाव येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर चौधरी यांच्या गट क्रमांक 39/2 मधील शेतात आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, वीज वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या आगीत सुमारे 80 आर क्षेत्रातील उभे मका पीक पूर्णतः जळून खाक झाले असून 100 टक्के नुकसान झाले आहे. घटनेनंतर तत्काळ पंचनामा करण्यात आला असून तलाठी इफ्तार देशमुख यांनी पाहणी करून अहवाल तयार केला. यावेळी एमएसईबीचे स्थानिक कर्मचारी तसेच गावातील नागरिक तुषार यशवंत चौधरी, ताराचंद अशोक महाजन, नामदेव पांडुरंग पाटील, शंकर भगवान पाटील व शांताराम जगन्नाथ महाजन उपस्थित होते.

दरम्यान, अशा प्रकारच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येते.शासनाने त्वरित काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

चाळीसगाव शहरातील एटीएम फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत

April 20, 2026

भुसावळ शहरातील पाणीपुरवठा,विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे संतप्त भूमिका घेत ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी!

April 20, 2026

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप भुसावळमध्ये राजकीय वाद पेटला

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add