रुग्णवाहीकाच नसल्याने रुग्णांचे हाल

जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही.
किनगाव ता. यावल : किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात एम. १९ एम. ९२९१ क्रमांकाची १०२ रुग्णवाहिका २६ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली आहे. ती ६ मार्च २०२६ रोजी दुरुस्तही झाली असून दुरुस्तीचे बिल २१ हजार ३२७ रुपये हे दि. ६ मार्चलाच जिल्हा परिषदे कडे पाठवण्यात आले. मात्र जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
विशेष म्हणेज रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे आपापसात वाद होत असतात. तरी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित या गाडीचे दुरुस्तीचे बिल देय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील रुग्ण करीत आहेत.
मा. जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडून मार्च महीन्यातच आरोग्य विभागाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देता येत नाही म्हणून विलंब होत आहे. मात्र येत्या दोन दिवसातच वेबसाईट सुरू होईल अशी आशा आहे. वेबसाईट सुरू होताच दुरुस्तीचे बिल देय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा डॉ. सचिन भायकर


