
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
जळगाव । दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.
भाजप खासदारांनी आंदोलन करून विरोधकांवर टीका केली. परंतु संसदेच्या आवारात आंदोल केल्याप्रकरणी पोलिसांनी आज शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतलं आहे.नेमकी घटना काय?
शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते, मात्र बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झाले. विधेयक पडल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या महिला खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी जाणीवपूर्वक विधेयक रोखल्याचा आरोप करत रक्षा खडसे, बन्सुरी स्वराज यांच्यासह अनेक महिला खासदारांनी संसदेच्या आवारातच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली होती.


