Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप भुसावळमध्ये राजकीय वाद पेटला

राजकारण

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप भुसावळमध्ये राजकीय वाद पेटला

Editorial DeskBy Editorial DeskApril 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील राजकारण सध्या तापले असून नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते युवराज लोणारी यांनी भंगाळे यांच्या आरोपांचे जोरदार खंडन करत उलट त्यांच्या जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .


वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक पिंटू कोठारी, परिक्षित बऱ्हाटे, निकी बत्रा, राजू आवटे, राहुल तायडे, बोधराज चौधरी , पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


युवराज लोणारी यांनी दावा केला की, नगराध्यक्षा भंगाळे-गौर या कुरमी ओबीसी प्रवर्गातील असून त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची जात प्रमाणपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली. तसेच भंगाळे यांनी केलेला आरोप — की मंत्री संजय सावकारे जात पडताळणी प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत — हा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


लोणारी यांनी सांगितले की, जात पडताळणी समितीकडे प्रकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच सत्य समोर येईल. निवडणूक नियमांनुसार सहा महिन्यांत जात पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असताना भंगाळे यांना त्यांचा दावा सिद्ध करता येणार नाही, कारण कागदपत्रे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी नगरसेवक निकी बत्रा यांनी गायत्री गौर यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रात खाडाखोड झाल्याचा आरोप करत ते दस्तऐवज पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच नगरपालिकेच्या नोंदींमध्येही नियमबाह्य जातीचा उल्लेख करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add