Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली

ताज्या बातम्या

धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 26, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मुलगा झाला नाही म्हणून पोटच्या ३ दिवसांच्या मुलीची बापाने केली हत्या !

जामनेर प्रतिनिधी : मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली आहे. चौथीदेखील मुलगीच झाली या रागातून एका निर्दयी बापाने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची निघृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. याला आधीच ३ मुली आहेत. चौथ्या वेळी मुलगा होईल, अशी त्याला आशा होती. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा झाला नाही, याच रागातून कृष्णा राठोड याने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रागाच्या भरात घरामध्ये असलेल्या लाकडी पाटाने ३ दिवसांच्या राधिका नावाच्या बालिकेच्या डोक्यात प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी पिता कृष्णा राठोड याला २५ डिसेंबर रोजी रात्री ८:५१ वाजता अटक केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. एका बापानेच आपल्या पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे हत्या केल्याने समाजातील मुला-मुलींच्या भेदाची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add