
जळगाव दौऱ्यात नुकतीच ब्रम्हचैतन्य वेदपाठशाळेस भेट देवून माहिती घेत भरघोस मदतीचे आश्वासन दिले आहे.
जळगाव । परशूराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि शिवसेना नेत्या अर्चनाताई सुरडकर यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात नुकतीच ब्रम्हचैतन्य वेदपाठशाळेस भेट देवून माहिती घेत भरघोस मदतीचे आश्वासन दिले आहे.जळगाव शहरात नुकतीच भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दि १८ रोजी अर्चनाताई सुरूडकर यांनी पालखी महोत्सव तर रविवारी कॅप्टन आशिष दामले यांनी बहुभाषिक ब्राम्हणसंघ आयोजीत भगवान परशूराम जयंती सोहळयास उपस्थीती दिली. ब्रह्मश्री परिवारचे अशोक वाघ यांच्या विनंतीवरून या दोन्ही पाहुण्यांनी पूर्वनियोजित दौर्यामध्ये ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट दिली.तेथील वेदाचार्य गढीकर व वेद अभ्यासक विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून शाळेच्या परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी वाघ, हार्दिक वाघ, सुनील कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, दिपक महाजन, प्रसाद निशानदार, राहुल कुलकर्णी आणि इतर ब्रह्मश्रीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी बोलताना आशिषजी दामले यांनी सर्व शाखीय वेदाभ्यासक व पौरोहित्य शिकणार्या वेदाभ्यासकांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर सर्व शासकिय ब्राम्हण पौरोहित्य करणार्यांना विमा कवच व निवृत्ती वेतन देण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अशोक वाघ यांच्यासह सर्व सदस्यांनी परशुराम पालखी सह, वर्षभर इतर समाजोपयोगी कार्य व मदतकार्य सुरु ठेवण्याचा ब्रह्मश्री परिवारातर्फे संकल्प केला. नुकतेच ब्रह्मश्री बहुउद्देशीय सर्व शाखिय ब्राह्मण संस्था, जळगावचे स्वतःचे संपर्क कार्यालय स्थापन केले असून त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले आहे.समाजाच्या प्रगतीसाठी ब्रह्मश्रीचे हे कार्य पाहून सतत नवीन बंधू व भगिनी सदस्य जोडले जात आहेत. आणि या समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावत आहेत.


