Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा भुसावळमध्ये पर्दाफाश

ताज्या बातम्या

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा भुसावळमध्ये पर्दाफाश

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

७ मोटारसायकली जप्त, दोघे अटकेत

भुसावळ प्रतिनिधी :  शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


तापी नगर येथील आशीष विनायक झोपे (वय ३६) यांनी २२ एप्रिल २०२३ रोजी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२३ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.


दरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने संशयित रविंद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.


सखोल चौकशीत आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या एकूण ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये होंडा शाईन, बजाज पल्सर (१२५, १३५, १५०) तसेच सुझुकी बर्गमन यांसारख्या वाहनांचा समावेश आहे.


या प्रकरणातील चोरीच्या घटना भुसावळ, जामनेर, जळगाव एमआयडीसी आणि नांदुरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपींना २२ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे व राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add