Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा

राजकारण

शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा

Editorial DeskBy Editorial DeskApril 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश….

मुंबई येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात डॉ. मनोहर पाटील आणि विश्वजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हा प्रमुख समाधान महाजन तसेच शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नेत्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जामनेर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

सारोळा ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी होणार; आ. किशोर पाटलांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

September 16, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात ‘नमो उद्यान’चे लोकार्पण

September 16, 2026

३४ हजार न्यायालयीन कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; जळगावात काळ्या फिती लावून निषेध

September 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add