Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कर्मचारीच निघाला चोर : एथर शोरूमधून रोकड लंपास

क्राईम

कर्मचारीच निघाला चोर : एथर शोरूमधून रोकड लंपास

Editorial DeskBy Editorial DeskApril 23, 2026Updated:April 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरात विश्वासघाताची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एथर शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच शोरूममधील लॉकर फोडून १ लाख ६८ हजार रुपयांची रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एथर शोरूमचे मॅनेजर दीपक नितीन मोरे यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल रोजी शोरूमचे कामकाज आटोपून सर्व कर्मचारी घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत शोरूममधील हाऊस कीपिंग कर्मचारी महेश राजेंद्र देवरे याने रात्री शोरूममध्ये शिरून चोरी केली. त्याने लॉकरमधील ५०० रुपयांच्या ३३६ नोटा, म्हणजेच १ लाख ६८ हजार रुपये चोरले.

दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मॅनेजर मोरे यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी महेश देवरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे अधिक तपास करत आहेत.

crime jamner jamner crime police
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add