Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक : महिला सफाई कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग

क्राईम

धक्कादायक : महिला सफाई कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग

Editorial DeskBy Editorial DeskApril 23, 2026Updated:April 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

एरंडोल- महा लाईव्ह न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात एका ४४ वर्षीय सफाई कामगार महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत आणि हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला कासोदा येथील एका शासकीय कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. २२ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घराचे गेट बंद करत असताना संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या जमशेर खान याने अचानक गेटला लाथ मारून दहशत निर्माण केली. पीडित महिलेने याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करत तिच्या जातीविषयी अपमानास्पद वक्तव्य केले.

यानंतर संशयित आरोपीने महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिचा हात पकडत लज्जास्पद कृत्य केले. या वेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या महिलेच्या वहिनीलाही संशयित आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिला ही तातडीने कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या जमशेर खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहे.

crime erandol police
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add