Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»नंदकिशोर महाजन विधान परिषदेच्या शर्यतीत; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

जळगाव

नंदकिशोर महाजन विधान परिषदेच्या शर्यतीत; कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 24, 2026Updated:April 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी । रावेरच्या राजकीय पटलवर सध्या एकाच नावाच्या चर्चेने जोर धरला आहे, ते म्हणजे भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर महाजन. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाजन यांच्या नावाची संभाव्य उमेदवारी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षनिष्ठा, अफाट जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यामुळे महाजन यांचे पारडे जड मानले जात आहे.

जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व :
रावेल तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असलेले नंदकिशोर महाजन हे केवळ राजकीय नेते नसून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. रावेर, मुक्ताईनगर आणि यावल या पट्ट्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. २४ तास मोबाईलवर उपलब्ध राहून लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांना एक ‘आदरणीय’ स्थान मिळाले आहे. कोरोनासारख्या कठीण काळात त्यांनी स्वतः जीवाची बाजी लावून केलेल्या मदतकार्याची आजही आठवण काढली जाते.

राजकीय अनुभवाची शिदोरी :
महाजन यांचा राजकीय प्रवास अत्यंत अभ्यासू राहिला आहे. रावेर पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती म्हणून काम पाहिल्यानंतर, त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून प्रशासकीय अनुभवाची मोहर उमटवली आहे. जिल्हा परिषदेत असताना त्यांनी केलेली विकासकामे आजही रावेरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा विधान परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला होऊ शकतो, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट :
नंदकिशोर महाजन यांचे नाव चर्चेत येताच रावेरसह परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाजन यांना संधी मिळाल्यास स्थानिक प्रश्नांना राज्यस्तरावर वाचा फोडण्यास मदत होईल, अशी खात्री समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jalgaon politics
Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add