Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर उगारला बडगा!

क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर उगारला बडगा!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात एकाच वेळी विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अवैध वाळूची वाहतूक करणारी ४ वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण ४३ हजार रुपये किमतीची वाळू हस्तगत करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी धडक कारवाई
ही कारवाई २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान करण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी धाडी टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. यामध्ये  विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस स्टेशननिहाय जप्तीचा तपशील
या मोहिमेत प्रामुख्याने चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहने पकडण्यात आली:
भडगाव पोलीस स्टेशन: ४.५ लाखांचा ट्रॅक्टर आणि ४ हजारांची वाळू.
चोपडा ग्रामीण: ४ लाखांचा ट्रॅक्टर आणि ४,००० रुपयांची वाळू.
चाळीसगाव ग्रामीण: १० लाखांचा डंपर आणि २०  हजारांची वाळू.
यावल पोलीस स्टेशन: ७ लाखांचा डंपर आणि १५,००० रुपयांची वाळू.
अशा प्रकारे एकूण २५ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने आणि ४३,००० रुपयांची अवैध वाळू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

माफियांना कडक इशारा
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, अनधिकृतपणे खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कडक कारवाई यापुढेही निरंतर सुरू राहील. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

crime Jalgaon Jalgaon crime Jalgaon police
Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add