Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»खून करण्याचा प्रयत्न; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम

खून करण्याचा प्रयत्न; पिंपळगाव हरेश्वर पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskApril 26, 2026Updated:April 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कु-हाड तांडा परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नातेवाईकांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात सात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा या गावात २४ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुमित रूपचंद तंवर हे आपल्या घराबाहेर होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून रणवीर ऊर्फ मणी सुरेश चव्हाण, सुमित अंकुश राठोड, आकाश शांताराम ठाकरे, दीपक मांगीलाल राठोड, आकाश राजू राठोड, गोपाळ ठाकरे आणि एक अनोळखी तरुण यांनी एकत्र येऊन फिर्यादी आणि त्यांचे चुलत भाऊ हिनेश इंद्रजित तंवर यांना घेरले.

आरोपींनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत इंद्रजित तंवर यांच्यावर धारदार चाकूंनी हल्ला केला. त्यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

crime pachora
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add