Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भुसावळात भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

क्राईम

भुसावळात भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी संधी साधत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भुसावळ शहरातील यशवंत कॉलनी परिसरात शोभा सुधाकर जयकारे (वय ४५) ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यास घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेधडकपणे घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.

चोरट्यांनी केलेल्या या हातसफाईत तब्बल १ लाख १२ हजार ६५३ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यात सोन्याच्या अंगठ्या, कानातले दागिने, लहान चिपा आणि चांदीचे दागिने तसेच रोख रकमेचा समावेश आहे. घरी परतल्यानंतर शोभा जयकारे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्वरित भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add