Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पहूरजवळ भीषण अपघात; कारला पिकअपची धडक, एकाचा मृत्यू

क्राईम

पहूरजवळ भीषण अपघात; कारला पिकअपची धडक, एकाचा मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskMay 3, 2026Updated:May 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पहूर प्रतिनिधी । जळगाव-पहूर रस्त्यावर पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला असून, एका भरधाव बोलेरो पिकअपच्या निष्काळजीपणामुळे ४७ वर्षीय प्रौढाला आपला जीव गमवावा लागला आहे. शेख अमीनौद्दीन कमरौद्दीन (रा. पहूर पेठ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पहूर पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अमीनौद्दीन हे आपली सॅन्ट्रो कार क्रमांक (एमएच ०४ एफए ८०४१) घेऊन जळगाव रोडवरील संतोष बनकर यांच्या गॅरेजवर काही कामासाठी गेले होते. त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी उभी केली होती. शेख अमीनौद्दीन हे कारमधून उतरून गॅरेज मालकाशी संवाद साधत असतानाच, जळगावकडून पहूरच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच १९ सीवाय ९२०२) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय वेगात आणि बेदरकारपणे चालवत आणले.

रस्त्यावरील परिस्थितीचा कोणताही अंदाज न घेता, या चालकाने उभ्या असलेल्या सॅन्ट्रो कारला आणि तिला लागूनच उभ्या असलेल्या शेख अमीनौद्दीन यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अमीनौद्दीन हे गंभीररित्या फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर बोलेरो चालक फरार झाला असून, घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी सलीम शेख अनिस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राहुल पाटील करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add