Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान

ताज्या बातम्या

थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 27, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

थर्टी फस्टसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? जळगावमार्गे उद्या धावणार स्पेशल ट्रेन

जळगाव । थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागाने या वर्षी थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता बिलासपूर-मडगाव व बिलासपूर-वलसाड या मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली. या गाडीला जळगावला देखील थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

बिलासपूर-मडगाव (०८२४१) दर शनिवारी दु. २.४५ वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी ६.५८ वाजता जळगावात येईल. सोमवारी पहाटे ही गाडी मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-बिलासपूर (०८२४२) दर सोमवारी पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि मध्यरात्री १२.४० वाजता जळगाव स्थानकावर येईल. स्लीपर क्लाससाठी ७०० रुपये तिकीट आहे.

थांबे : या रेल्वेला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनंदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी आदी स्थानकांवर थांबा आहे.

जळगावमार्गे धावणाऱ्या मंगला लक्षद्वीप, गोवा एक्स्प्रेस व वास्को द गामा यांसारख्या गाड्यांमध्ये २८ ते ३० डिसेंबर दरम्यान एकही जागा शिल्लक नाही. त्यामुळे पर्यटकांना आता तत्काळ कोट्यावर अवलंबून राहावे लागेल. विमानाने दीड तासात गोवा जळगावातून गोव्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध असल्याने दीड तासात गोवा गाठता येणार आहे. मात्र, – मागणी वाढल्याने विमान भाड्यात मोठी वाढ झाली आहे. २९ डिसेंबरला गोव्याचे भाडे ६, ४३६ रुपये असून ३१ तारखेला ते ३,९३७ रुपयांपर्यंत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add