Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नाही : आमदार अनिल पाटील

क्राईम

रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नाही : आमदार अनिल पाटील

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 18, 2026Updated:May 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेले बांधकाम व अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले.

उपजिल्हा रुग्णालयासाठी सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे पाहून आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. बांधकामामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्यासह तुटलेले दरवाजे आणि इतर दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रुग्णालयातील काही बेडशीट अस्वच्छ आढळून आल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त करत रुग्णांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. औषधालयासह विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वच्छता, औषधसाठा व रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि स्वच्छ सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी उष्माघात कक्षाचीही पाहणी केली. या कक्षात कुलर, थंड पाणी, आवश्यक औषधसाठा आणि अन्य सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील आणि बांधकाम अभियंता भागवत माळी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add