Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

क्राईम

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

Editorial DeskBy Editorial DeskMay 19, 2026Updated:May 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरातील रायसोनी नगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केसीई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हेमंत प्रदीप जाधव (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी हेमंतने लिहिलेली एक भावुक सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून, त्यात त्याने स्वतःच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार न धरता, आपले अवयव गरजूंना दान करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हेमंतचे वडील एका खासगी कंपनीत कार्यरत असून आई एस.टी. महामंडळात वाहक (कंडक्टर) आहे. सोमवारी आई-वडील दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेले होते. दुपारी घरी कोणीही नसताना हेमंतने वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. संपूर्ण घरात शोध घेतल्यानंतर वरच्या खोलीत हेमंत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाची ही अवस्था पाहून वडिलांनी एकच आक्रोश केला.

​घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवला, जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता एक सुसाईड नोट सापडली. त्यात त्याने लिहिले होते, “सॉरी पप्पा… माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे कोणाचे मन दुखवले गेले असेल तर माफ करा आणि मला आनंदाने जाऊ द्या. माझ्या पश्चात कोणतीही चौकशी करू नका आणि माझे अवयव गरजूंना दान करा… तुमचा अपराधी बंटी.”

​विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी, २८ एप्रिल रोजी हेमंतच्या बहिणीचे लग्न झाले होते. घरात आनंदाचे वातावरण असताना हेमंतने अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add