Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

जळगाव

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

Editorial DeskBy Editorial DeskMay 19, 2026Updated:May 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मंगळवारी सकाळपासून जळगाव शहरातील विविध पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ट्रक, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पेट्रोलचाही तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन उपलब्ध असल्याने वाहनधारकांची झुंबड उडाली. तर अनेक पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” तसेच “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीचा परिणाम शेतकरी, व्यापारी, प्रवासी आणि दैनंदिन कामासाठी वाहनांवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होत आहे.

दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी तेल कंपन्यांनी पुरवठा वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add