Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पोलीस अधीक्षकांच्या पत्नी सानिका धिवरे यांनी साधला पोलीस कुटुंबीयांशी थेट संवाद; निवासस्थानांना दिली सदिच्छा भेट

जळगाव

पोलीस अधीक्षकांच्या पत्नी सानिका धिवरे यांनी साधला पोलीस कुटुंबीयांशी थेट संवाद; निवासस्थानांना दिली सदिच्छा भेट

Editorial DeskBy Editorial DeskMay 31, 2026Updated:May 31, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी थेट जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे तसेच मातोश्री उषा धिवरे यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संवाद साधला.

​या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि दैनंदिन गरजा समजून घेणे हा होता. सानिका धिवरे यांनी विविध निवासस्थानांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणी, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि वसाहतीमधील मूलभूत सुविधांची माहिती घेतली. कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी या बाबी तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन दिले. “पोलीस कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आव्हानात्मक असते, अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

​या भेटीत वसाहतीमधील विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधण्यात आला. स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी आणि वेळेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करत सानिका धिवरे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले. विशेष म्हणजे, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अंमलदारांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले, तसेच व्यसनाधीनतेपासून दूर राहून चांगला आहार घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

​या प्रसंगी उपस्थित लहान मुलांना मिठाई आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या अनौपचारिक संवादामुळे पोलीस कुटुंबांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले असून, त्यांच्या सामाजिक व मानसिक सक्षमीकरणासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add