Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»सावकरांच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवले जीवन; जळगावमधील धक्कादायक घटना

क्राईम

सावकरांच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवले जीवन; जळगावमधील धक्कादायक घटना

Editorial DeskBy Editorial DeskJune 1, 2026Updated:June 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव जवळील खेडी शिवारात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून सावकारी पाशाचा आणखी एक बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

​अक्षय रवींद्र पाटील (वय २५, रा. खेडी शिवार, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. अक्षय एका बँकेत फायनान्स विभागात कार्यरत होता. त्याने काही व्यक्तींकडून खाजगी कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यासाठी संबंधित सावकाराने त्याच्याकडे पैशांचा प्रचंड तगादा लावला होता. “पैसे दिले नाही तर जीवे ठार मारू,” अशी धमकीही त्याला देण्यात आली होती. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर अक्षयने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.
​रविवारी दुपारी अक्षयने घरातील मागच्या खोलीत गळफास घेतल्याचे त्याच्या वडील आणि बहिणीच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला. अक्षयला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

​दरम्यान, या घटनेनंतर आज शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत संबंधित दोषी सावकारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add