जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज एकूण १६ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि अपक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती.
या प्राप्त झालेल्या अधिकृत यादीनुसार, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
१. प्रविण गंगाराम पाटील
२. चौधरी निलेश सुरेश
३. आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद
४. जंगले सुनिल नेमिदास
५. शेख दानिश शेख निसार
६. जावेद इकबाल अब्दुल रशीद
७. नंदकिशोर भागवत महाजन
८. तायडे शरद शामराव
९. चौधरी सचिन संतोषराव
१०. चौधरी अनिल छबिलदास
११. रेश्मा कुंदन काळे
१२. दिपक काशीनाथ भांडे
१३. निलेश गणेश झोपे
१४. कलीमखान हैदरखान मनियार
१५. जितेंद्र रमेश देशमुख
१६. घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील
या १६ उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकल्यामुळे जळगावची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक होण्याची चिन्हे आहेत. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज दिवसभर समर्थकांची मोठी गर्दी आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. आता पुढील टप्प्यात या दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार असून, कोण आपले अर्ज मागे घेते आणि प्रत्यक्ष मैदानात किती उमेदवार उरतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अर्जांच्या माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.



