Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»नाविन्यपूर्ण अध्यापनाचा बहुमान! शिक्षक समाधान जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जळगाव

नाविन्यपूर्ण अध्यापनाचा बहुमान! शिक्षक समाधान जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Editorial DeskBy Editorial DeskJune 2, 2026Updated:June 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ प्रतिनिधी | शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांना २०२५-२६ चा अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

समाधान जाधव हे भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे येथे कार्यरत असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव प्राथमिक शिक्षक ठरले आहेत.

​संस्थेच्या कडक नियमावली आणि अत्यंत पारदर्शक निवड प्रक्रियेनुसार हा निवड सोहळा पार पडला. राज्यभरातील शेकडो शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रामुख्याने विद्यार्थीकेंद्रित कार्याचा सखोल आढावा घेऊन या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. यामध्ये समाधान जाधव यांनी शैक्षणिक गुणवत्तेसाठी घेतलेले परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम मैलाचा दगड ठरले.
​हा भव्य गौरव सोहळा नुकताच संपन्न झाला असून, माननीय पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते समाधान जाधव यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष गोविंद चौधरी यांच्यासह संस्थेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​समाधान जाधव यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे काहुरखेडे गाव, भुसावळ तालुका आणि पर्यायाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add