Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक

जळगाव

भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पूर्वतयारीबाबत अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.

जळगाव प्रतिनिधी । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून नेमून दिलेली कामे वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह महसूल विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

एसटी महामंडळाच्या सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 18, 2026

यावल सातपुडा पर्वतरांगांत वणवा लावताना तरुणाला रंगेहाथ पकडले ; यावल वनविभागाची कारवाई

March 18, 2026

राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अलर्ट, जळगावात काय स्थिती?

March 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add