Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या प्रयत्नांनी १२ वर्षीय बालकाच्या आयुष्यात आशेचा किरण

जळगाव

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या प्रयत्नांनी १२ वर्षीय बालकाच्या आयुष्यात आशेचा किरण

Editorial DeskBy Editorial DeskJune 7, 2026Updated:June 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी  | वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वाईट संगतीमुळे मद्य, गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका बालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचार आणि समुपदेशनामुळे नवजीवन मिळाले आहे. या यशस्वी उपचारांमुळे बालकाची प्रकृती सुधारत असून त्याचे लक्ष पुन्हा शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळू लागले आहे.

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारा हा विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना काही मित्रांच्या संगतीत आला. या संगतीचा परिणाम म्हणून त्याने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागली. व्यसनामुळे त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढला, भूक कमी झाली आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागले. मुलाच्या बदललेल्या वर्तनामुळे पालक चिंतेत पडले.
पालकांनी तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. येथे मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्याची सखोल तपासणी केली. आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसह औषधोपचार सुरू करण्यात आले. याचबरोबर नियमित समुपदेशनाद्वारे बालकाच्या मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.

उपचारादरम्यान त्याला विविध सर्जनशील आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी केलेले उपचार, समुपदेशन आणि कुटुंबाचे सहकार्य यामुळे बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्याच्या आयुष्यात नव्या आशेची पहाट उगवली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add