Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​धक्कादायक: डंपर रिव्हर्स घेताना झोपलेल्या कामगाराला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

क्राईम

​धक्कादायक: डंपर रिव्हर्स घेताना झोपलेल्या कामगाराला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील सुदर्शन पेपर प्रॉडक्ट्स कंपनीच्या आवारात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कंपनीच्या आवारात झोपलेल्या एका ३८ वर्षीय कामगाराच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर रिव्हर्स घेत निष्काळजीपणे चढवून त्याचा मृत्यू घडवून आणल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राजा भैय्या नथ्थू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, जि. बांधा, उत्तर प्रदेश, ह.मु. सुदर्शन पेपर मिल, भुसावळ) असे मृत पावलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. ४ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास राजा भैय्या हे सुदर्शन पेपर मिलच्या मोकळ्या आवारात झोपलेले होते. दरम्यान, एका अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाळूने पूर्ण भरलेला डंपर अत्यंत हलगर्जीपणे आणि वेगात मागे (रिव्हर्स) घेतला. हा डंपर झोपलेल्या राजा भैय्या यांच्या डाव्या खांद्यावर आणि मानेवर चढला.

डंपरचे जड चाक अंगावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
​अपघाताची तीव्रता भीषण असतानाही, आरोपी डंपर चालकाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. अपघात घडल्याची पूर्ण जाणीव असतानाही त्याने जखमीला उपचारासाठी दवाखान्यात नेले नाही. घटनेची माहिती कोणालाही न देता तो डंपरसह घटनास्थळावरून फरार झाला

​या घटनेप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धीरज जनार्दन मंडलिक (वय ४९, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add