Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कुलर कंपनीला भीषण आग; लाखोंचे साहित्य खाक, अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला!

क्राईम

कुलर कंपनीला भीषण आग; लाखोंचे साहित्य खाक, अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला!

Editorial DeskBy Editorial DeskJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | येथील एमआयडीसी परिसरातील ‘एल सेक्टर’मध्ये असलेल्या एका कुलर निर्मिती कारखान्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत कुलरचे सुटे भाग, मोटार, प्लास्टिक आणि इतर कच्चे साहित्य जळून खाक झाले असून, यात कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने या कंपनीत कुलर निर्मितीचे काम वेगात सुरू होते. दुपारी अचानक कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. कुलर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सुके गवत (पॅड) आणि प्लास्टिकचे साहित्य यामुळे आगीचा भडका अत्यंत वेगाने उडाला. आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली होती.

​लाकूड वखार थोडक्यात वाचली :
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, ज्या कंपनीला आग लागली, तिच्या अगदी शेजारीच लाकडाची एक मोठी वखार (डेपो) होती. जर आग तिथे पोहोचली असती, तर संपूर्ण एमआयडीसी परिसरात मोठा अनर्थ घडला असता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत अत्यंत तत्परतेने पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

​कंपनी मालक लल्लन यादव यांनी सांगितले की, “दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाले आणि साहित्याने पेट घेतला. कुलरचे मटेरियल असल्याने आग वेगाने पसरली. सुदैवाने, सर्व कामगार सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.”
​अग्निशमन दलाच्या वेळेवर मिळालेल्या प्रतिसादामुळे शेजारच्या कंपन्या सुरक्षित राहिल्या असून, परिसरातील उद्योजकांनी जवानांचे आभार मानले आहेत. पोलीस आणि प्रशासन या आगीच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add