Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात खळबळ: वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या!

क्राईम

जळगावात खळबळ: वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या!

Editorial DeskBy Editorial DeskJune 9, 2026Updated:June 9, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील शामनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ एका तात्कालिक आणि क्षुल्लक वादातून ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ८ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत एका संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे, तर त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​जीवन शालीक पाथकर ऊर्फ जीवन मिस्तरी (वय ६४, मूळ रहिवासी – रोटवद, ता. जामनेर) असे या दुर्दैवी मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन मिस्तरी हे गेल्या १५ वर्षांपासून जळगावात राहत होते. आईच्या निधनानंतर पत्नीने त्यांची साथ सोडली होती, तर मुलानेही वेगळा संसार थाटल्यामुळे ते अत्यंत एकाकी जीवन जगत होते. शहरात कचरा वेचून आणि मिळेल ते काम करून ते स्वतःची गुजराण करत असत.

​८ जून रोजी शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ एक रक्ताळलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र राजपूत आणि अजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

​दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच, मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार याला या घटनेची माहिती मिळाली. त्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेह पाहिला असता, तो त्याच्या मामाचा म्हणजेच जीवन पाथकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तुषारने मामासोबत राहणाऱ्या अन्य दोघांवर संशय व्यक्त केला. प्राथमिक तपासात दोघांनी क्षुल्लक वादातून जीवन यांना बेदम मारहाण केली आणि ते खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या केल्याचे समोर आले.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अजित पाटील, जितेंद्र राजपूत, सुधाकर अंबुरे आणि सुशील चौधरी यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे जळगाव शहरात तीव्र खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add