Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६ ठिकाणी छापे टाकून दारू व सट्ट्याचे अड्डे केले जमीनदोस्त!

क्राईम

पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६ ठिकाणी छापे टाकून दारू व सट्ट्याचे अड्डे केले जमीनदोस्त!

Editorial DeskBy Editorial DeskJune 10, 2026Updated:June 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव पोलिसांनी एक मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कडक निर्देशांनुसार, जळगाव शहर, एमआयडीसी परिसर आणि शिरसोली येथे अवैध सट्टा जुगार व गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण करून हे अवैध धंदे चालवले जात होते, ते सर्व अड्डे पोलिसांनी जागेवरच जमीनदोस्त केले आहेत. या धडक कारवाईत एकूण ४३ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन DySP प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वात एका विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, आवेश शेख आणि अमोल ठाकूर यांनी अत्यंत गुप्तता बाळगत ही यशस्वी कामगिरी बजावली.

​अशी झाली ६ ठिकाणी कारवाई:
पथकाने बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील ‘मिलन डे’ सट्टा अड्ड्यावर छापा टाकून घनश्याम पाटील व मुकेश मराठे यांना पकडले व ९ हजार ४७० रुपये जप्त केले. पुष्पा पेट्रोल पंपाजवळ ‘टाईम बाजार’ सट्टा चालवणाऱ्या हनिफ सैय्यद व रवींद्र पाटील यांच्याकडून ७ हजार ८० रुपये जप्त करण्यात आले. आर.एल. चौफुली जवळील सट्टा जुगारातून मदानंद शिंदे, शुभम जाधव आणि कैलास खेळवण यांच्याकडून ३ हजार ४९० रुपये हस्तगत केले. तसेच, शिरसोली गावात सट्टा चालवणाऱ्या रवींद्र धनगर याच्याकडून सर्वाधिक १७ हजार १० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

​याशिवाय, एमआयडीसी हद्दीत पुष्पा पेट्रोल पंप आणि आर.एल. चौफुली जवळ पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकून सुरेश सपकाळे व विशाल राठोड यांना ६० लिटर दारूसह बेड्या ठोकल्या. पोलिसांनी हे दोन्ही दारूचे अड्डे जागेवरच उद्ध्वस्त केले.

​एकूण ३७ हजार ०५० रुपयांची सट्ट्याची रोकड आणि ६ हजार रुपयांची दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा कडक इशारा पोलिसांमार्फत देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add