Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​भुसावळ हादरले! पहाटेच्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये गावठी कट्टा, तलवारींसह मुद्देमाल जप्त; एक तडीपार जेरबंद

क्राईम

​भुसावळ हादरले! पहाटेच्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये गावठी कट्टा, तलवारींसह मुद्देमाल जप्त; एक तडीपार जेरबंद

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 10, 2026Updated:June 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ प्रतिनिधी | शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध एक अत्यंत मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. १० जून रोजी पहाटे ३ ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास संपूर्ण शहरात व्यापक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​या मोहिमेदरम्यान पोलिसांनी तब्बल ९९ सराईत गुन्हेगारांची कसून तपासणी केली, तर ६३ संशयितांच्या घरांची प्रत्यक्ष झाडाझडती घेतली. सर्व आरोपींचे ‘इंटरॉग्रेशन फॉर्म’ भरून घेत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. वाहन तपासणी मोहिमेत ११२ वाहने तपासण्यात आली असून, त्यापैकी २३ संशयित वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, चोपडा पोलीस ठाण्यातील चोरीची एक दुचाकीही या कारवाईत निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.

​शस्त्रास्त्रांचा साठा जप्त व आर्म्स ॲक्टनुसार गुन्हे
कारवाई दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांवर मोठी टाच आणली. यात १ गावठी कट्टा, १ जिवंत काडतूस, २ तलवारी आणि १ कोयता जप्त करण्यात आला असून, आर्म्स ॲक्टनुसार ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १४२ नुसार एका तडीपार आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

​हातभट्ट्यांवर धाडी आणि आंतरराज्यीय कारवाई
शहरालगत सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्ट्यांवर ३ ठिकाणी धाडी टाकून १ लाख ९ हजार रुपये किमतीचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. याशिवाय, मध्य प्रदेशातील खंडवा जीआरपी (रेल्वे पोलीस) गुन्ह्यातील एका पाहिजे असलेल्या फरार आरोपीलाही भुसावळ पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

​तगडा पोलीस बंदोबस्त :
ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत २० पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी.च्या ५ प्लाटूनचा तगडा फौजफाटा तैनात होता. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भुसावळमधील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अटक: जळगाव तालुका पोलिसांची कारवाई!

June 11, 2026

जळगावात रंगला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार; ५७२ खेळाडूंचा सहभाग!

June 11, 2026

​मानराज पार्कजवळ कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी गंभीर जखमी!

June 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add