Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले; विशेष टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई, ४ डंपर जप्त !

क्राईम

​पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले; विशेष टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई, ४ डंपर जप्त !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 11, 2026Updated:June 11, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​पाचोरा, प्रतिनिधी | अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पाचोरा तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय बनसोडे यांनी आखलेल्या प्रभावी रोडमॅपनुसार, १० जून रोजी रात्रीच्या सुमारास ‘विशेष टास्क फोर्स’ने मौजे डोकलखेडा येथून अवैध वाळूची वाहतूक करणारे जळगाव येथील चार डंपर जप्त केले. या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

​ही मोहीम अत्यंत गोपनीयता आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. महसूल व पोलीस प्रशासनाच्या २३ सदस्यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने काम करत संबंधित डंपर ताब्यात घेतले आणि ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा केले. पाचोरा प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे तहसील कार्यालय परिसर आणि शासकीय रुग्णालयालगतचे कंपाउंड जप्त वाहनांनी अक्षरशः भरून गेले आहे.

​या विशेष मोहिमेत टास्क फोर्स क्रमांक १ व २ च्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल पवार, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाठ, अविनाश जंजाळे, दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे यांच्यासह इतर महसूल कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. तसेच, पोलीस विभागाचे ब. दु. सिंग बंजारा, हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख व अशोक पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

​अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते, त्याला या कारवाईमुळे चाप बसला आहे. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि शासकीय महसुलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अटक: जळगाव तालुका पोलिसांची कारवाई!

June 11, 2026

जळगावात रंगला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार; ५७२ खेळाडूंचा सहभाग!

June 11, 2026

​मानराज पार्कजवळ कार-रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी गंभीर जखमी!

June 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add