Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ

जळगाव

घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

खाद्यतेलांच्या किमंतींमध्ये वाढ ; गृहिणींच्या बजेटला फटका

जळगाव । घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. पामतेल १३२ वरून १३७, सूर्यफूल तेल १६० वरून १७२ रुपये प्रतिकिलो झाले आहे. तीळ तेल २६० रुपयांवर स्थिर आहे. साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. मात्र मागच्या काही दिवसात खाद्यतेलात वाढ झाली.

काय आहे दरवाढीचे कारण?
अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व अमेरिकन डॉलरच्या दरात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या कारणांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add