Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पोलिसांची जिल्हाभरात धडक कारवाई! ‘ऑपरेशन ऑल आऊट’मध्ये अवैध धंद्यांचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

क्राईम

पोलिसांची जिल्हाभरात धडक कारवाई! ‘ऑपरेशन ऑल आऊट’मध्ये अवैध धंद्यांचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 17, 2026Updated:November 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत अवैध धंदे, दारूविक्री, जुगार, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत अवैध गावठी दारूविक्रीप्रकरणी १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी १२ गुन्हे नोंदवण्यात आले. जुगार कायद्यान्वये ४६ गुन्हे दाखल करून ६० जणांवर कारवाई करण्यात आली. शस्त्र अधिनियमानुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच अमली पदार्थविरोधी कारवाईत ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

याशिवाय हरविलेल्या १७ महिला, पुरुष, मुली व मुलांचा शोध घेण्यात आला. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून चोरीचे व हरविलेले ४२ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

या विशेष मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जिल्हा बँक निवडणुकीचा आज फैसला! १६ जागांसाठी माघारीची धावपळ; महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम!

November 17, 2026

जिल्हा बँक निवडणुक: महायुतीचा जागावाटप तिढा कायम! गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बंदद्वार बैठक

November 16, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय रणधुमाळी! २१ जागांसाठी ४०० हून अधिक उमेदवार मैदानात; १७ नोव्हेंबरला माघारीचा फैसला!

November 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add