Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची रणनिती बैठक; नंदकिशोर महाजनांच्या विजयाचा विश्वास

जळगाव

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची रणनिती बैठक; नंदकिशोर महाजनांच्या विजयाचा विश्वास

Editorial DeskBy Editorial DeskJune 15, 2026Updated:June 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी आखण्यात येणारी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीतील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर दीपमाला काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची वाढती ताकद, राज्य सरकारने राबविलेली विकासकामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि पक्षशिस्तीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान करताना घ्यावयाची काळजी, मत वैध राहण्यासाठी आवश्यक बाबी तसेच निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी विविध शंका उपस्थित करून त्यांचे निरसन करून घेतले.

महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याने नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यात महायुतीला मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह लक्षात घेता ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नगरसेवकांनीही पूर्ण ताकदीने काम करून महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add