Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पहाटेची पोलिसांची धडाकेबाज मोहीम; जळगावात १२५ पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाई !

क्राईम

पहाटेची पोलिसांची धडाकेबाज मोहीम; जळगावात १२५ पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाई !

Editorial DeskBy Editorial DeskJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आज पहाटे विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत झालेल्या या मोहिमेत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १२५ हून अधिक सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात चोरी, मारहाण, दरोडा, खंडणी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले.

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या विविध पथकांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करून अनेक अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतले. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून, शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण मोहिमा राबविल्यास गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम राखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा विशेष मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add