Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पार्सल देण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या जबरी चोरीप्रकरणी तीन आरोपी जेरबंद

क्राईम

पार्सल देण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या जबरी चोरीप्रकरणी तीन आरोपी जेरबंद

Editorial DeskBy Editorial DeskJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील लक्ष्मीआंगन कॉलनी परिसरात ऑनलाइन पार्सल देण्याचा बहाणा करून घरात घुसत महिलेसह तिच्या मुलांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले ७ हजार ७०० रुपये आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर व त्याच्या दोन साथीदारांनी कुसुम एकनाथ मोकळे (रा. लक्ष्मीआंगन कॉलनी, पाचोरा) यांच्या घरी अमेझॉनचे पार्सल आल्याचे सांगत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर एका आरोपीने कुसुम मोकळे व त्यांच्या दोन मुली आणि मुलाला एका ठिकाणी बसवून नकली पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने मागितले. कपाटातील सामानाची उचकापाचक करत आरोपींनी कपाटातील ७ हजार रुपये रोख आणि मुलाच्या गल्ल्यातील ७०० रुपये असा एकूण ७ हजार ७०० रुपयांचा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (रा. सातगाव-डोंगरी, ता. पाचोरा) याला अटक केली. चौकशीत त्याचा मामा गोकुळ महादू वाघ (पाटील) तसेच योगेश परशराम शिंदे (रा. सातपूर, नाशिक) यांचा गुन्ह्यात सहभाग उघड झाला. योगेश शिंदे याच्याकडून चोरीची रक्कम व गुन्ह्यात वापरलेले नकली पिस्तूल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add