Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»एटीएम चोरीचा प्रयत्न फसला : पोलीस आल्याचे पाहून चोरट्यांनी ठोकली धूम !

क्राईम

एटीएम चोरीचा प्रयत्न फसला : पोलीस आल्याचे पाहून चोरट्यांनी ठोकली धूम !

Editorial DeskBy Editorial DeskJune 17, 2026Updated:June 17, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा मोठा डाव फसला आहे. पोलिसांना वेळीच सुगावा लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले असून, एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

​मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडले :
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणेचार वाजेच्या (३:४५) सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन अज्ञात तरुण गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनचे कॅबिनेट तोडत होते. त्यांनी पैशांनी भरलेले मुख्य कॅबिनेट तोडून ते जवळच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा गाडीत (क्र. MH 49 CS 7028) भरण्याची तयारी केली होती.

​पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग :
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहताच चोरट्यांची तारांबळ उडाली. चोरटे पैशांचे कॅबिनेट तिथेच टाकून क्रेटा गाडीत बसून तारखेड्याच्या दिशेने सुसाट वेगाने पळून गेले. पाचोरा पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा थरारक पाठलाग धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत सुरू होता.

​बँक प्रशासनाचा हलगर्जीपणा :
चोरटे धुळे किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने पळून गेल्याची शक्यता असल्याने टोल नाके आणि धुळे, एमपी कंट्रोल रूमला तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे बँक लुटली जाण्यापासून वाचली असली, तरी बँकेच्या तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचा कमालीचा हलगर्जीपणा समोर आला आहे. इतकी मोठी घटना घडूनही एसबीआय एटीएमचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी सकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add