Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी बातमी : पोलिसांची ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहीम; मुक्ताईनगरातील तीन गावांवर पहाटे धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

क्राईम

मोठी बातमी : पोलिसांची ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहीम; मुक्ताईनगरातील तीन गावांवर पहाटे धाड, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJune 19, 2026Updated:June 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, मधपुरी आणि लालमाटोटा या गावांमध्ये पहाटेच्या सुमारास राबविलेल्या ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ या विशेष मोहिमेद्वारे मोठी कारवाई करत अनेक संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू, जुनी नाणी, सोन्या-चांदीच्या वस्तू तसेच मौल्यवान खजिना मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

मुक्ताईनगर पोलिसांच्या हद्दीतील या गावांमधून मागील काही वर्षांत फसवणूक, जबरी चोरी, दरोडे आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध धाडसत्र राबविले.

या कारवाईदरम्यान विलास नथू पवार आणि अजय दादा पवार यांना अटक करण्यात आली. तसेच फरोज राजू पवार, रामजाने रायसिंग भोसले, आक्काबाई जोगिंदर भोसले, रोहित सुदेश पवार, राजकिरण जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवविक्रम जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले आणि गांधी नरीसिंग भोसले यांच्याविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २० लाखांची रोकड, अंदाजे ३० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८ लाख रुपये किमतीचे चार किलो चांदीचे दागिने, २७ मोबाईल फोन, चार दुचाकी, चारचाकी वाहने, दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी रिव्हॉल्वर, पिस्तूल, तसेच हरिण, कोल्हा आणि सशाच्या कातड्यांसह इतर साहित्य जप्त केले आहे.

तपासात आरोपी सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ प्रसारित करून दुर्मिळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे आमिष दाखवत नागरिकांना गावात बोलावत असत. त्यानंतर नकली वस्तू दाखवून किंवा विविध कारणे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. विरोध करणाऱ्यांना धमक्या देणे, मारहाण करणे आणि काही प्रकरणांमध्ये खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून गप्प बसवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

या विशेष मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसेल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मोठी बातमी: प्लास्टिक कच्च्या मालाला भीषण आग; शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल जळून खाक !

June 19, 2026

पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त नागरिकांचा एल्गार

June 19, 2026

मुक्ताईनगरात खळबळ! बंदुकीचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला लुटले; विवस्त्र करून व्हिडिओ बनवला

June 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add