Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात योगासन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात योगासन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Editorial DeskBy Editorial DeskJune 20, 2026Updated:June 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेला योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विश्व मंगल योग व निसर्गोपचार केंद्र येथे बुधवारी (दि. 17 जून) सकाळी झालेल्या या स्पर्धेत जळगाव, शिरपूर आणि पुणे येथील योगसाधकांनी सहभाग घेत विविध योगासनांचे प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रतिमापूजन, पतंजली पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष कृणाल महाजन, विभाग प्रमुख सुनील गुरव, जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन तसेच कोषाध्यक्ष नूतन जोशी उपस्थित होते.

स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी संतुलन, लवचिकता, एकाग्रता आणि शारीरिक क्षमता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. योगशिक्षिका हेमांगीनी सोनवणे, सुनील गुरव, डॉ. शरयू विसपुते आणि डॉ. भावना चौधरी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे नियोजन व संयोजन प्रा. चित्रा महाजन आणि प्रा. अर्चना गुरव यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहन चौधरी, कविता चौधरी, पल्लवी उपासनी आणि नीलिमा लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेला उपस्थित योगसाधक, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य आणि बौद्धिक विकास साधता येतो. अशा स्पर्धांमुळे युवकांमध्ये योगाविषयी जागरूकता आणि आकर्षण वाढण्यास मदत होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान, या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ 21 जून रोजी सकाळी 11 वाजता मायादेवी नगर येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add