Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»भुसावळ पोलीस दलात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात; ‘निरोगी शरीर, शांत मन’ चा दिला संदेश!

आरोग्य

भुसावळ पोलीस दलात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात; ‘निरोगी शरीर, शांत मन’ चा दिला संदेश!

Editorial DeskBy Editorial DeskJune 21, 2026Updated:June 21, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ (प्रतिनिधी) | “योग: कर्मसु कौशलम्” हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भुसावळ उपविभागातर्फे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जळगावच्या माननीय पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथील शहर वाहतूक शाखा येथे सकाळी ६ ते ८ या वेळेत हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.

​या विशेष प्रसंगी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या शिबिराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. ‘महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ, भुसावळ’ यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नामांकित योग प्रशिक्षक श्री. यश प्रसाद आंबेकर आणि डॉक्टर राधा प्रसाद आंबेकर यांनी उपस्थित पोलीस बांधवांना मार्गदर्शन केले.

​तज्ज्ञ प्रशिक्षकांनी दैनंदिन पोलीस कर्तव्य बजावताना येणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग साधना कशी जीवनशैलीचा भाग बनवता येईल, यावर विशेष भर दिला. त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान आणि तणावमुक्तीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध योगक्रियांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण दिले.

​या शिबिरासाठी भुसावळ उपविभागांतर्गत येणाऱ्या भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत उत्साहाने व शिस्तीत सर्व योगासने पूर्ण केली. पोलीस दलातील प्रत्येक घटकाचे आरोग्य सुदृढ राहावे आणि कार्यक्षमता वाढीस लागावी, या उद्देशाने राबवण्यात आलेले हे योग शिबिर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add