Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकींग : कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्याने हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात !

क्राईम

ब्रेकींग : कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्याने हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात !

Editorial DeskBy Editorial DeskJune 22, 2026Updated:June 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

नशिराबाद प्रतिनिधी | येथील खंडेराव मंदिर परिसरात कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई जाधव यांच्यावर त्यांचे पती विकास जाधव यांनी कौटुंबिक कारणावरून संतापाच्या भरात कोयत्याने मानेवर वार केले. या हल्ल्यात मंदाबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.

हत्येनंतर आरोपी विकास जाधव घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत त्याला अल्पावधीतच जेरबंद केले. त्यामुळे पुढील तपासाला गती मिळाली आहे.
मृत मंदाबाई या नशिराबाद येथील रहिवासी असून त्या रामा सोमा बागले यांच्या कन्या असल्याची माहिती आहे. त्यांचा विवाह रायपूर येथे झाला होता. काही दिवसांपासून पती-पत्नी नशिराबाद येथे वास्तव्यास होते. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add