Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»एआयद्वारे तयार बनावट फोटोप्रकरणी कारवाईची भाजपची मागणी

जळगाव

एआयद्वारे तयार बनावट फोटोप्रकरणी कारवाईची भाजपची मागणी

Editorial DeskBy Editorial DeskJune 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले कथित बनावट व मॉर्फ फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली जात असल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या चाळीसगाव तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली आहे.याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया माध्यमांवर एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले दिशाभूल करणारे फोटो प्रसारित केले जात असून, त्यामागे संबंधितांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट फोटो तयार करणारे, प्रसारित करणारे तसेच अशा पोस्ट पुढे पाठविणाऱ्या संबंधितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा व सायबर गुन्हे प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी नितीन पाटील, नगरसेवक हर्षल चौधरी, नगरसेवक प्रशांत कुमावत, स्वीकृत नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक योगेश खंडेलवाल, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेवक संभा आप्पा जाधव, स्वीकृत नगरसेवक मोहित बजाज, नगरसेवक वसीम शेख, नगरसेवक अभय वाघ, नगरसेवक धर्मराज बच्छे, बाळासाहेब पवार, मुकेश चौधरी, योगेश गव्हाणे, प्रवीण मराठे, धनंजय पाटील, मनोज चौधरी, दीपक घुले, जयेश कारडा, राम पाटील, डॉ. प्रशांत एरंडे, योगेश ब्राम्हणकर, अजय वाणी, अमोल चौधरी, स्वप्निल मोरे आणि बंडू पगार उपस्थित होते.

सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने व प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add