Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»सावकारीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, ९ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव

सावकारीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, ९ जणांवर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskJune 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा प्रतिनिधी । व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी वारंवार फोन करून शिवीगाळ, धमक्या आणि तीव्र मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत लोणी पंचक सजाचे तलाठी अरविंद लिलाधर जाधव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून दोन पत्रकारांसह नऊ संशयित आरोपींविरुद्ध सावकारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याने स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद लिलाधर जाधव (वय ३२, रा. शिवकॉलनी, चोपडा) हे चोपडा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. वैयक्तिक व कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी काही व्यक्तींकडून रोख तसेच ऑनलाइन माध्यमातून पैसे घेतले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी मूळ रकमेपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्याजाची मागणी सुरू केली. ७ जानेवारी ते ५ एप्रिल या कालावधीत संशयित आरोपींनी वारंवार मोबाईलवर, ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष भेटून पैशांसाठी तगादा लावला.

या सततच्या मानसिक तणावामुळे त्रस्त होऊन २४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अरविंद जाधव यांनी चोपडा शहरातील एका हॉटेलजवळ धारदार ब्लेडच्या साहाय्याने स्वतःच्या हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने जळगाव येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हापेठ पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून पुढील तपासासाठी हे प्रकरण चोपडा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.

या प्रकरणात सनी ऊर्फ संदीप प्रकाश शिरसाठ, बंटी ऊर्फ अशोक कैलास मैराळे, कल्पेश दिलीप थोरात, रूपेश गोकुळ भालेराव, शामकांत भाऊराव जाधव, नरेश कैलास साळुंखे, ज्ञानेश्वर रामदास सोनवणे, निलेश पांडुरंग वाघोदे आणि मंगल पांडुरंग पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश हिरे पुढील तपास करत आहेत. सर्व कॉल रेकॉर्ड्स आणि ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खासगी सावकारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add