Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जामन्या वन्यजीव क्षेत्रात वनविभागाची मोठी कारवाई; २ लाखांचे सागवानी लाकूड जप्त!

जळगाव

जामन्या वन्यजीव क्षेत्रात वनविभागाची मोठी कारवाई; २ लाखांचे सागवानी लाकूड जप्त!

Editorial DeskBy Editorial DeskJune 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी । नाशिक वन्यजीव वनविभागांतर्गत समृद्ध आणि सुंदर वनसंपदा लाभलेल्या यावल वन्यजीव अभयारण्यात वनविभागाने तस्करीविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. अभयारण्यातील जामन्या वन्यजीव वनक्षेत्रातून तस्करांनी चोरून आणलेला आणि तस्करीच्या तयारीत असलेला सागवान इमारती लाकडाचा मोठा साठा वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे.

जामन्या वनपरीक्षेत्रातंर्गत परिसरातून अवैधरित्या सागवानाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वनक्षेत्रपाल (RFO) रूपेश दूसाने यांनी तातडीने पावले उचलत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वनपरिक्षेत्रात कडक गस्त घालण्याचे व बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अतिसंवेदनशील वनक्षेत्रात सागवान लाकडाचा मोठा साठा लपवून ठेवलेला आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही मोहीम सुरू करण्यात आली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही वनविभागाच्या पथकाने मागे हट न घेता तब्बल ६ तास अत्यंत दुर्गम भागात ही कारवाई सुरू ठेवली. रात्री ८ वाजता ही मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली. या कारवाईत सुमारे ६ ते ७ घनमीटर आकाराचे, सागवानाचे ४५ ते ५० नग लाकूड जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या सागवानी लाकडाचे बाजारमूल्य अंदाजे २ लाख रुपये इतके आहे.

ही धडक कारवाई उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक श्री. कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक श्री. सत्यजीत निकत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, जामन्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. रूपेश दूसाने यांच्या पथकाने केली. या प्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या धाडसी कारवाईत वनपाल गणेश नगराळे, किरणसिंग राजपूत, तसेच वनरक्षक नोकेश बारेला, अब्दुल तडवी, आरिफ तडवी, जगदीश बारेला, आशा तडवी, अश्विनी पावरा, अरुण बारेला आणि दिनेश बारेला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच गस्ती पथकातील वनरक्षक रिला पावरा, निर्मला पावरा, पिंटू पावरा, पवन बारेला, संजय बारेला, सुरेश बारेला, निलेश बारेला, लालसिंग बारेला, जगदिश बारेला, रवीन बारेला व संरक्षण वनमजुरांनी भर पावसात मोलाचे सहकार्य केले. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add