Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»तहसीलदारांच्या निलंबनाच्या मागणी : चोपड्यात निघणार विराट जनआंदोलन; सर्वपक्षीयांसह पत्रकार महासंघ आक्रमक

क्राईम

तहसीलदारांच्या निलंबनाच्या मागणी : चोपड्यात निघणार विराट जनआंदोलन; सर्वपक्षीयांसह पत्रकार महासंघ आक्रमक

Editorial DeskBy Editorial DeskJune 27, 2026Updated:June 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा प्रतिनिधी |  चोपडा तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करून संपत्तीची ईडी, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. तसेच, या मागण्यांसाठी २९ जून रोजी दुपारी १२ वाजता चोपडा तहसील कार्यालयासमोर विराट जनआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात तहसीलदारांच्या कार्यकाळात अवैध वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध अनियमितता, कर्तव्यात कसूर, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई तसेच पत्रकारांशी अपमानास्पद वागणूक अशा अनेक गंभीर तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यापूर्वी ३ जून रोजीही पत्रकारांनी याच विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन दिले होते. मात्र, अद्याप संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जनआंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनावर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन स्वीकारताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तहसीलदारांच्या निलंबनाचा अधिकार त्यांच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे सांगत, संबंधित अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add