Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​​अमळनेर पालिकेचा निर्लज्जपणा: शववाहिनी ऐवजी मृतदेहासाठी वापरली घंटागाडी, नागरिकांमध्ये तीव्र संताप

क्राईम

​​अमळनेर पालिकेचा निर्लज्जपणा: शववाहिनी ऐवजी मृतदेहासाठी वापरली घंटागाडी, नागरिकांमध्ये तीव्र संताप

Editorial DeskBy Editorial DeskJune 27, 2026Updated:June 27, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​अमळनेर प्रतिनिधी | शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या ठेकेदाराने चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ‘घंटागाडी’चा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अमळनेर शहरासह संपूर्ण तालुक्यातून पालिकेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांत या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी कोणतेही नातेवाईक समोर आले नाहीत. शेवटी प्रशासनाने या बेवारस मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

​अगोदरच बेवारस मृत्यू आणि त्यात कोणीही नातेवाईक पाठीशी नसताना, पालिका आणि रुग्णालय प्रशासनाने मृतदेहाची सन्मानाने शववाहिनीतून वाहतूक करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदाराने संवेदनशीलतेचा कळस गाठत हा मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीत टाकून अंत्यविधीसाठी नेला. मानवी मूल्ये किती खालावली आहेत, याचाच प्रत्यय या घटनेतून आला.

​नगराध्यक्षांकडून चौकशीचे आश्वासन
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमळनेरचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add