Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पाचोरा तालुक्यात खळबळ: आर्थिक वादातून एकाची रेल्वेखाली आत्महत्या; मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल!

क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ: आर्थिक वादातून एकाची रेल्वेखाली आत्महत्या; मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल!

Editorial DeskBy Editorial DeskJune 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. संभाजीनगर येथील रहिवासी असलेले रवींद्र महाजन यांनी रेल्वेखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, घटनेपूर्वी मृत महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करत गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्याशी आर्थिक व्यवहारावरून मोठा वाद सुरू होता. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संबंधित डॉक्टरांना बिनव्याजी पैसे दिले होते, परंतु डॉक्टरांनी ते पैसे परत देण्यास साफ नकार दिला.

या आर्थिक विवंचनेतून आणि वादातून महाजन यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला होता, ज्यामध्ये डॉक्टरांच्या हाताला दुखापत झाली आणि ते सुदैवाने वाचले.या घटनेनंतर महाजन यांनी रेल्वेखाली धाव घेत आत्महत्या केली.

रवींद्र महाजन यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये अत्यंत भावनिक आणि आक्रमक आवाहन केले आहे. “माझ्यानंतर माझ्या संपूर्ण खानदानाची (कुटुंबाची) जबाबदारी आता संबंधित व्यक्तीवर असून, मला आणि माझ्या कुटुंबाला शासनाने न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी या व्हिडिओत केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. व्हिडिओतील पुराव्यांच्या आधारे संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add