Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»तरुणाने राहत्या घरात संपविले जीवन: कारण अस्पष्ट; पत्नीचा आक्रोश!

क्राईम

तरुणाने राहत्या घरात संपविले जीवन: कारण अस्पष्ट; पत्नीचा आक्रोश!

Editorial DeskBy Editorial DeskJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील तडवीवाडा येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २९ जून सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हिरामण बोरसे (वय ४०, रा. तडवीवाडा, हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील बोरसे हे पत्नी मायाबाई आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. पती-पत्नी दोघेही जैन कंपनीत कामाला जात होते.

सोमवारी सकाळी मायाबाई बोरसे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी उठल्या. त्यावेळी त्यांनी घराच्या पुढील खोलीत पतीने गळफास घेतल्याचे पाहिले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने सुनील बोरसे यांना खाली उतरवून तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

सुनील बोरसे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी मायाबाई तसेच जय आणि प्रेम ही दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add